भटुंबरे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. राजाबाई पांडुरंग गडदे यांची सर्वानुमती निवड. 

उपसरपंच पदाची निवड प्रशासक अधिकारी श्री. गावडे पंचायत समिती पंढरपूर

भटुंबरे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. राजाबाई पांडुरंग गडदे यांची सर्वानुमती निवड. 
भटुंबरे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. राजाबाई पांडुरंग गडदे यांची सर्वानुमती निवड. 

भटुंबरे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. राजाबाई पांडुरंग गडदे यांची सर्वानुमती निवड. 

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू होती. त्यामुळे भटुंबरे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवड विधानसभेच्या निवडणूकीमुळे थोडे दिवस लांबणीवर पडली होती परंतु आज सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी शासकीय नियमानुसार दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालय भटुंबरे येथे आज उपसरपंच पदाची निवड प्रशासक अधिकारी श्री. गावडे पंचायत समिती पंढरपूर तसेच ग्रामसेवक, सौ .उघडे गायकवाड, नूतन उपसरपंच सौ .राजाबाई पांडुरंग गडदे मावळते उपसरपंच बाई बाळू डांगे, ग्रामपंचायत सदस्य सौ.पूजा अमरसिंह खांडेकर, सदस्य रूपाली आबासाहेब कारंडे, सदस्य, भुवनेश्वर महेश प्रचंडराव, भावी निवड होणाऱ्या सरपंच सदस्य सौ .रानु भीमा गायकवाड, सदस्य सनातन ज्ञानोबा वाघमारे, सदस्य, उत्तम कुंडलिक जाधव हे सर्व सदस्य उपस्थित होते या वेळी नूतन उपसरपंच सौ राजाबाई पांडुरंग गडदे यांची सर्व सदस्यांच्या सर्वानुमते निवड करण्यात आले आहे. 

यावेळी अजयसिंह नाना खांडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की निवडणूक लढवताना दोन पार्ट्या होत्या परंतु आता दोन्ही पार्टी एकत्रित होऊन संपूर्ण ग्रामस्थ एकत्रित आलो आहोत हा निर्णय सर्वांच्या मते असल्याने आज सौ. राजाबाई पांडुरंग गडदे यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी नूतन उपसरपंच सौ राजाबाई गडदे यांचा गावातील सौ वाघमारे , सौ वायदंडे, यांच्यासह पाच ते सहा महिलांनी नूतन उपसरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा हार व श्रीफळ देऊन सन्मान केला . त्याचबरोबर नूतन उपसरपंच राजाबाई गडदे व पांडुरंग गडदे यांचा सपत्नीक पती-पत्नीचा गुलाब तुलसी हार घालून सन्मान करण्यात आला आहे. व पुढील वाटचालीस त्यांना ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.

भटुंबरे गावचा विकास चांगला करावा ग्रामस्थांच्या अडीअडचणीकडे सर्वांनी लक्ष देऊन आपण सर्व चांगले काम करेल अशा आशा व्यक्त करतो आणि थोड्या दिवसात नूतन सरपंच यांची निवड घेण्यात येईल असे सांगितले. त्याचबरोबर मार्गदर्शक अंकुश शेंबडे यांनी यापूर्वी आम्ही ज्येष्ठ व गावातील सर्वांनी एकत्र येऊन भटुंबरे गाव पूर्वी बिनविरोध सर्व सदस्यांना करण्यास भाग पाडले होते. अगोदर40 वर्ष झाली होती कधीच भटुंबरे गाव बिनविरोध झालेलं होते परंतु त्यावेळी आम्ही करून दाखवले असेच यापुढे आपण एकत्रित राहू आपण भटुंबरे गावची ग्रामपंचायत निवडणूक न लढवता बिनविरोध निवड करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहूया असे म्हणाले. त्याचबरोबर हरिभाऊ प्रक्षाळे यांनी सांगितले की ग्रामपंचायत हे एक मिनी मंत्रालय असते आपण गावासाठी विकास करून चांगले निर्णय घ्यावेत आपल्या गावाकडे एक आदर्श गाव म्हणून इतर गावांनी बघितले पाहिजे नागरिकांना सुविधा म्हणजे पाणी रस्ता वीज याचीच खरी गरज असते तेव्हा आपण गावचा विकास करावा असे सांगितले. या भटुंबरे ग्रामपंचायत नूतन उपसरपंच निवडी प्रसंगी सिंहाचा वाटा असणारे समाधान शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक माजी सरपंच नारायण मेटकरी, माजी उपसरपंच आबासाहेब कारंडे, पोपट शिंदे, अंकुश शेंबडे, युवा नेते दत्तात्रय येडगे, विकास डांगे, पांडुरंग गडदे,अमरसिंह खांडेकर सर, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती मस्के, श्याम कसबे, ग्रामपंचायत शिपाई सिद्धेश्वर अधटराव, क्लार्क सौ मिना वाघमारे, अन्य भटुंबरे गावातील ग्रामस्थ स्त्री-पुरुष व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भटुंबरे ग्रामपंचायत समोर तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महिला व पुरुष पोलीस उपस्थित होते सर्वांनी सहकार्य केल्याने उपसरपंचाची निवड शांततेत पार पडली आहे.