आ समाधान आवताडे यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना नाहक त्रास.

आ समाधान आवताडे यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष.

आ समाधान आवताडे यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष

पंढरपूर दी.20 ऑगस्ट

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आ.समाधान आवताडे यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे त्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे शेतकऱ्यांना वीज व पाण्याचा तर ञास असतोच परंतु राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही महत्वकांक्षी निर्णय घेण्यात आले आहेत त्याचा सुद्धा लाभ घेण्यासाठी त्यांना जाणीवपूर्वक ञास दिला जात आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लागावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वता लक्ष घालून ही योजना देश भरात लागू केली व त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश सर्व राज्यांच्या मुख्यमंञ्याना मोदी यांनी स्वता दिले परंतु देशात व महाराष्ट्र राज्यात भाजप सरकारमध्ये असून पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार देखील सरकार असलेल्या भारतीय जनता पार्टीचे आहेत तर विषेश म्हणजे सध्या महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये तरी आ.समाधान आवताडे येथिल शेतकऱ्यांना पीक कर्जास बँकांकडून नियमबाह्य होणाऱ्या कागदपञांची मागणी व पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ तहसिल कार्यालय का तालुका कृषी अधिकारी कार्यालयातुन मिळतो या प्रश्नाचा तोडगा लोकप्रतिनिधी यांना काढावा व शेतकऱ्यांना याची माहिती देऊन होणाऱ्या नाहक ञासातुन सुटका करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे