जात पडताळणी समितीकडून सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव समाज बांधवांची अडवणूक 

अनुसूचित जमातीचे दाखले नाकारले जात आहेत

जात पडताळणी समितीकडून सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव समाज बांधवांची अडवणूक 

जात पडताळणी समितीकडून सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव समाज बांधवांची अडवणूक 

आदिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश अधटराव यांनी दिला उग्र आंदोलनाचा इशारा 

महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात कोळी महादेव,टोकरे कोळी आदी अनुसूचित समाज बांधवांची संख्या मोठी आहे.राज्य शासनाच्या जात पडताळणी निकषानुसार रक्ताच्या नात्याचे पुराव्याची कागदपत्रे तसेच इतर सर्व ती आवश्यक कागदपत्रे जोडूनही पंढरपुर प्रांताधिकारी कार्यालयाकडून तसेच पुणे विभागीय जात पडताळणी समितीकडून सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीच्या समाज बांधवाना अनुसूचित जमातीचे दाखले नाकारले जात आहेत.      वास्तिवक पाहता या बाबत सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव समाजाच्या वतीने मागील अनेक वर्षात वारंवार आंदोलने केली आहेत.उपोषणे केली आहेत शासन दरबारी निवेदने देत पाठपुरावा केला आहे.शासन कर्त्यांकडून आश्वासने देऊनही या बाबत कोळी महादेव समाजाची अडवणूक अजूनही सुरूच आहे.        सोलापूर जिल्ह्यात कोळी महादेव समाजातील अनुसूचित जात प्रमाणपत्र धारकांच्या सोबत अनेक पिढयांचे रक्ताचे नाते संबंध असल्याचे पुरावे जोडूनही जात पडताळणी समितीकडून अडवणूक करण्याचा प्रकार सुरूच आहे.तसेच अनेकांना यासाठी पैसे मागितले जात असल्याचाही अनुभव आलेला आहे.         २०१८ मध्ये शासनाने हरिदास कमिटीच्या शिफारशी नुसार कोळी महादेव समाजातील बांधवाना रक्ताचे नात्याचे सबळ पुरावे सादर केल्यास  अनुसूचित जात प्रमाणपत्रे देण्यात यावेत अशा सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत.तरीही सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव समाज बांधवांची पुणे विभागीय जात प्रमाणपत्र समितीकडून अडवणूक केली जात आहे.सबळ पुरावे जोडूनही जात प्रमाणपत्रे नाकारली जात आहेत.                 तरी या गंभीर प्रकराची तात्काळ दखल घेत शासनाने योग्य ती कार्यवाही करावी हे नम्र निवेदन.शासनाने कोळी महादेव समाजाच्या या गंभीर प्रश्नांची दखल न घेतल्यास आषाढी यात्रा महापूजेसाठी मुख्यमंत्री महोदय पंढरीत आले असता कोळी महादेव समाजातील जात पडताळणी समितीकडून दाखले नाकारलेले कुटूंबीय गनिमी कावा पद्धतीने निषेध व्यक्त करण्यासाठी उग्र आंदोलन करतील असा इशारा आदिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश अधटराव यांनी दिला आहे.