पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सुरक्षा रामभरोसे

भाविकांना मारहाण दर्शन रांगेतून इतरांना सोडणे याप्रकरणी बी.व्ही.जी रक्षकावर गुन्हे दाखल.

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सुरक्षा रामभरोसे
पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सुरक्षा रामभरोसे

पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सुरक्षा रामभरोसे अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण?

Bvg सुरक्षा रक्षक ठेका रद्द करा भाविकांची मागणी. 

आषाढी यात्रेदरम्यान भाविकांना मारहाण दर्शन रांगेतून इतरांना सोडणे याप्रकरणी बी.व्ही.जी रक्षकावर गुन्हे दाखल.

पंढरपूर, दि. ( प्रतिनिधी ) ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महापूजे नंतर पहाटे 5.30 वाजता पहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर मंदिरात सत्कार समारंभास आलेले शासकीय अधिकारी, व्हीआयपी, महाराज मंडळी, राजकीय पदाधिकारी यांना मंदिरातील कार्यालयाजवळून लोखंडी कंपाऊंड मधून 2 दरवाजातून सोडले जात होते. मात्र पहाटे 5.30 वाजता या ठिकाणी ना मंदिर समितीचा कर्मचारी होता. ना खाजगी सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या बीव्हीजी कंपनीचा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नसल्याने येथील लोखंडी कंपाऊंडच्या दोन रॉड मधून जीव धोक्यात घालून महापूजेस आलेल्या लोकांनी सावळ्या विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेतले. विशेष बाब म्हणजे जीव धोक्यात घालून मुखदर्शन रांगेतील पुरूष,महिला भाविक, व्हीआयपी बरोबरच या लोखंडी बार मधून पोलिस कर्मचारी तसेच शासकीय कर्मचारी जात असतानाचा व्हिडिओ पत्रकारांच्या कॅमेऱ्यात चित्रीत झालेला आहे. 

  विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरातील कार्यालयाजवळ कर्मचारी नेमलेले असतात. मात्र ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी महापूजेनंतर या ठिकाणी एकही कर्मचारी दिसून आला नाही. खुद्द मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांना कार्यालयात जाण्यासाठी बराच वेळ थांबावे लागले औसेकर महाराजांच्या कार्यकर्त्यांने मंदिरातील कर्मचाऱ्यांस फोन करून बोलावून घेतले. त्यावेळी त्यांना कार्यालयात जाण्यासाठी दरवाजा उघडण्यात आला होता. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपस्थित असलेले व्हीआयपी, पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांनीही जीवाची पर्वा न करता तसेच पत्रकार या घटनेचा व्हिडिओ शूटिंग करीत असल्याचे सांगून सुद्धा त्याकडे कानाडोळा करीत पदस्पर्श दर्शनासाठी पळापळ करीत असल्याचे चित्र या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

मंदिरातील कार्यालयाजवळ असणाऱ्या या लोखंडी कंपाऊंडच्या आत महापूजेचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शन चे महिला व पुरुष कर्मचारी बाहेर जाण्यासाठी थांबले होते. दूरदर्शनच्या या पथकातील महिला कर्मचारी कित्येक वेळा विनवणी करीत होते की आम्हाला बाहेर जायचे आहे कोणीतरी दरवाजा उघडा अशी विनवणी मंदिर समिती सह अध्यक्ष, सदस्या माधवी निगडे, शकुंतला नडगिरे यांना करीत होते. या दूरदर्शनच्या कर्मचाऱ्यांसमक्ष हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. या पथकातील एका महिला कर्मचाऱ्यांनी मंदिर समितीच्या या घटनेचा तीव्र निषेध करीत चुकून एखादी दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा सवाल देखील सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद करीत असलेल्या पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे.  या घटनेबाबत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता तो व्हिडिओ मला पाठवा असे मंगळवारी विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र त्यांच्याकडूनही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. या घटने संदर्भात मंदिर समिती तसेच बिव्हीजी कंपनीच्या विरोधात जिल्हाधिकारी, मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी कारवाई करावी अशी मागणी वारकरी भाविकांकडून केली जात आहे.

भाग १क्रमशः