*अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची विक्रमी 2275 फूट तिरंगा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विक्रमी 2275 फूट तिरंगा पदयात्रेचे आयोजन

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची विक्रमी 2275 फूट तिरंगा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची विक्रमी 2275 फूट तिरंगा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

दिनांक 29 ऑगस्ट 2022 

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूर शाखेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विक्रमी 2275 फूट तिरंगा पदयात्रेचे आयोजन पंढरपूर शहरात करण्यात आले होते. या पदयात्रेचा उदघाटन कार्यक्रम द ह कवठेकर प्रशाला येथे पार पडून ही पदयात्रा द ह कवठेकर प्रशाला ते Dysp ऑफिस - स्टेशन रोड - चौफळा - नाथ चौक - तांबडा मारुती - कालिकादेवी चौक - काळा मारुती - चौफळा मार्गे टिळक स्मारक मैदान पर्यंत काढण्यात आली आणि टिळक स्मारक मैदान येथे राष्ट्रगीताने पदयात्रेचा समारोप करण्यात आला, या 2275 फूट तिरंगा पदयात्रेच्या उदघाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीणजी दरेकर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री अभिजीत पाटील उपस्थित होते . या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे, सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, स्वेरीचे संस्थापक सचिव प्राचार्य डॉ. बी पी रोंगे, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय कवठेकर, स्वेरीचे विश्वस्त सुजय रोंगे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहराध्यक्ष प्रा नरसिंह बडवे, पंढरपूर जिल्हा संयोजक पार्थ तेरकर व कार्यक्रम प्रमुख प्रथमेश कोरे उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी विक्रमी तिरंगा पदयात्रा होत आहे याबद्दल प्रवीण दरेकर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विशेष कौतुक केले, तसेच सर्व तरुण पिढीच्या मनामध्ये देशाविषयी एक चांगली भावना निर्माण झाली पाहिजे व आपल्या देशासाठी पुढे सरसावले पाहिजे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा नरसिंह बडवे सर यांनी केले व सूत्रसंचालन मयूर पवार यांनी केले तर आभारप्रदर्शन पार्थ तेरकर यांनी केले, या पदयात्रेचे शहरात ठीक ठिकाणी पुष्पवृष्टी, फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले, या पदयात्रेत शहरातील सर्वच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी सहभाग नोंदवला, या पदयात्रेला पंढरपूर तालुका व शहरातील एकूण 5408 प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच देशप्रेमी नागरिक उपस्थित होते, या पदयात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशांत मदकंटे, वल्लभ वाघोलीकर, गुरुराज राऊत, अद्वैतसिंह ठाकूर, माऊली शिंदे, प्रणव बाडगंडी, शिवम साखरे, संचित जोशी, श्रीकांत जाधव, अदिती उत्पात, रोहिणी शिंदे, ऐश्वर्या शिंगटे, हितेश पुंज, दिग्विजय देशमुख व सचिन पारवे आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले