श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी तब्बल 405 उमेदवारानी  एकूण 430 अर्ज दाखल केले

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेनुनगर गुरसले या कारखान्याचे संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 2022

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी तब्बल 405 उमेदवारानी  एकूण 430 अर्ज दाखल केले

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी तब्बल 405 उमेदवारानी  एकूण 430 अर्ज दाखल केल.
एकूणअर्जाची विक्री  839 
पंढरपूर दिनांक 9 जून पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेनुनगर गुरसले या कारखान्याचे संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 2022 जाहीर झाल्यापासून तालुक्यातील अनेक संचालक मंडळाने विविध गावांमध्ये गटामध्ये बैठका घेऊन प्रत्येक जण आपण निवडणूक जिंकू हे ध्येय बाळगून अनेक श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ उमेदवारांनी तब्बल 405 उमेदवारी अर्ज दाखल केले असून.  एकूण 430 अर्ज दाखल केली असल्याची माहिती श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माहिती दिली.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे अटीतटीची व चुरशीची लढत होत असल्याने यामध्ये विविध संघटनाही निवडणुकीसाठी उतरल्याचे दिसत आहे. यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासून विविध गावांमध्ये गटांमध्ये बैठका घेऊन या निवडणूक दिसत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासून आज दिनांक 9 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण अर्ज विक्री 839 झाली असून यामध्ये 405 उमेदवारांनी एकूण 430 अर्ज दाखल केले आहेत. गुरुवार दिनांक 9 जून 2022 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. आता यापुढे कोणते संचालक मंडळ अर्ज माघारी घेनार आणि कोण ठेवणार  हे थोड्या दिवसात स्पष्ट होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.