श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरातून भव्य मोटरसायकल रॅली

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट

श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरातून भव्य मोटरसायकल रॅली

श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरातून भव्य मोटरसायकल रॅली

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र्यसंग्रमातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये हर घर तिरंगा झेंडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे त्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बँक, भादुले चौक, महाद्वार, कालिकादेवी चौक चौफाळा मार्गे योग भवन येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये ७५ योग साधक सहभागी झाले असल्याची माहिती योगा संस्थेचे अध्यक्ष अँड सुनील वाळूजकर सचिव प्रशांत आगावणे यांनी सांगितले