फलटण येथे 'सुपर वॉरियर्स'चा भव्य मेळावा संपन्न!

सुपर वॉरियर्सची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत फलटण येथे संपन्न

फलटण येथे 'सुपर वॉरियर्स'चा भव्य मेळावा संपन्न!

फलटण येथे 'सुपर वॉरियर्स'चा भव्य मेळावा संपन्न!

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभेतील विविध मतदारसंघातील सुपर वॉरियर्सची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत फलटण येथे संपन्न झाली. आगामी होणारी केवळ लोकसभाच नव्हे तर विधानसभेच्या सर्वच जागा निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू अशी ग्वाही देऊन ‘सुपर वॉरियर्सं’ना महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागणार आहे. यासाठी त्यांनी आगामी १३ महिने दररोज तीन तास पक्षासाठी द्यावेत, असे आवाहन केले. सुपर वॉरियर्सची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींवर देखील आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकाऱ्यांनी आपल्या कामात कसल्याही प्रकारची दिरंगाई करू नये, जेणेकरून पक्ष कार्यात कोणताही अडथळा होणार नाही. आगामी काळात सुपर वॉरियर्स ही संकल्पना पक्षाच्या महाविजयात महत्त्वाची भूमिका पार पडणार असून, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे असे अहवान बावनकुळे साहेबांनी केले.