रांजणी येथे आ. प्रशांत परिचारक आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन
रांजणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात 40 लाख रुपये मंजूर
रांजणी येथे आ. प्रशांत परिचारक आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते
पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन
पंढरपूर दि. 20 ऑगस्ट पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने 40 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान दादा अवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख म्हणून जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख ,पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरीश दादा गायकवाड, संतोष घोडके,सरपंच दादा साहेब ढोले, मुकुंद काका राजोउपाध्ये, ग्रामपंचायत सदस्य शहाजी घोडके, भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश पंडित उपस्थित होते. या भागातील पशुपालकाच्या व ग्रामस्थांच्या मागणीनुसार पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अपुरी पडत असल्याने नवीन इमारतीची गेल्या अनेक वर्षापासून मागणी सुरू होती या मागणीचा विचार करून जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतनाना देशमुख यांच्या प्रयत्नामुळे या नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे हे काम मार्गी लागले याबद्दल या भागातील पशुपालकांना मधून आनंद व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य दीपक पंडित, मारुती भाकरे, दादासाहेब घायल, किसन भुताडे, अकबर मुलानी , धनाजी पवार, अभिजीत माने, बाबासाहेब लक्ष्मण घाडगे, दिगंबर मोरे अशोक दांडगे, अशोक घोडके, महादेव सपकाळ, लक्ष्मण गांडुळे आदीसह गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.