योगमय वातावरणात प्रात्यक्षिके व होमहवनासह पंढरीत योगदिन साजरा*

8 वा आंतरराष्ट्रीय योगदिन योगा बरोबरच भक्तीमय व आध्यात्मिक वातावरणात मोठ्या उत्साहाने  पंढरीत साजरा

योगमय वातावरणात प्रात्यक्षिके व होमहवनासह पंढरीत योगदिन साजरा*

*योगमय वातावरणात प्रात्यक्षिके व होमहवनासह पंढरीत योगदिन साजरा
*रोजच्या दिवसाची सुरवात योगाने व्हावीः मा.आ.प्रशांत परिचारक*
पंढरपूर ः 8 वा आंतरराष्ट्रीय योगदिन योगा बरोबरच भक्तीमय व आध्यात्मिक वातावरणात मोठ्या उत्साहाने  पंढरीत साजरा झाला.मा.आ.प्रशांत परिचारक यांनी यावेळी फक्त योगदिनी योग न करता रोजच्या दिवसाची सुरवातच योगाने करण्याचे अवाहन केले.यावेळी पतंजली योग समितीच्या महाराष्ट्र प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे, निमा डाॕक्टर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॕ.विनायक टेंभूर्णीकर ,सीमाताई परिचारक,अमृताताई परिचारक,प्राचार्य बब्रुवान रोंगेसर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे,नगरपालिकेचे सहाय्यक मुख्याधिकारी सुनिल वाळुजकर व मान्यवर योग साधक उपस्थित होते.
      *मातृशक्तींच्या प्रचंड सहभागाने पंढरीतील या आंतरराष्ट्रीय योगदिनास एक वैशिष्ट्येपूर्ण झळाळी आली होती.योग शिबीराचे मार्गदर्शकत्व पतंजलीच्या राज्य महिला प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरे यांनी केले. वातावरणाच्या शुद्धीसाठी केलेल्या होमहवाने पौरुहित्य सुजाता आर्य या योगशिक्षिकेने केले.तर ज्योतीमय योग व निसर्गोपचार संस्थेच्या महिला,जवाहर विद्यालय मंगळवेढा,के डी अॕकॕडमीच्या मुलींनी योगप्रात्यक्षिके सादर केली.तर शेवटी वंदेमातरम राष्ट्रगीतही नगरसेविका संगीता जाधव यांनी म्हटले*.
     या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विठ्ठल व तुलसी पुजन करुन  बोलताना मा.आ.प्रशांत परिचारक यांनी मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांचेमुळेच जगातील 200 देशात योगदिन साजरा होत असून परमपुज्य रामदेवजी महाराज यांनी योग घराघरात पोहचविण्याचे काम केल्याचे सांगितले.योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपण कटिबद्ध आसल्याचेही त्यांनी सांगितले. या 8 व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आगळेवेगळे महत्व सांगून, सर्वांच्या सहकार्याने योगमय पंढरपूर करणार असल्याचा प्रास्तविकमध्ये सुधाताई अळ्ळीमोरे यांनी सांगितले.निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॕ.विनायक टेंभुर्णीकर यांनी करोनासारख्या महामारीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरु केलेल्या योगदिनाचा फायदा झाला असल्याचे सांगून योग,आयुर्वेदाचा अंगीकार करण्याचे अवाहन केले.मुख्य योग  प्रोटोकाॕलचे मार्गदर्शन  संतोष दुधाळ, नितीन मोरे, सुभाष मस्के यांनी केले.आभार युवकनेते प्रणव परिचारक तर योग महोत्सवाचे  सुत्रसंचलन प्रशांत वाघमारे यांनी केले.
      श्री.पांडुरंग सह.साखर कारखाना व पतंजली योग समिती आयोजीत या आंतरराष्ट्रीय योग महोत्सवात पत्रकार ,  पंढरपूर व परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा,महाविद्यालये,इंजिनिअरिंग काॕलेजेस्,डिप्लोमाकाॕलेजस्, फार्मसी काॕलेजस्,नगरपालिका,शिक्षण मंडळ,पंचायत समिती व शिक्षण विभाग,विविध प्रशासकीय विभागातील आधिकारी व कर्मचारी,विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी,साखर कारखान्यांचे संचालक,सायकलर्स क्लब,रोटरी क्लब, इनव्हेलर क्लब,योग संस्था,क्रीडामंडळे विद्यार्थी ,योगसाधक,प्रतिष्ठित नागरीक,मोठ्या संखेने शिक्षक ,विद्यार्थी -विद्यार्थिनी व महिला भगिनी उपस्थित होते.
     या योग महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी पतंजली योग समिती सोलापूर व पंढरपूर , श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखाना, अर्बन बॕक,पांडुरंग परिवारव  संस्था,प्रणव परिचारक मित्रमंडळ,रेल्वे प्रशासन,पोलीस प्रशासन,पत्रकार,फोटोग्राफर्स असोशिएशन यांनी प्रयत्न केले.
फोटो- पंढरीत योगमय,भक्तीमय वातावरणात साजरा झाला आंतरराष्ट्रीय योगमहोत्सव.