श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती कर्मचारी भरती टेंडर तात्काळ रद्द करा अन्यथा  आमरण उपोषण -भाई नितीन काळे 

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडेही मागणी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती कर्मचारी भरती टेंडर तात्काळ रद्द करा अन्यथा  आमरण उपोषण -भाई नितीन काळे 

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती कर्मचारी भरती टेंडर तात्काळ रद्द करा अन्यथा  आमरण उपोषण -भाई नितीन काळे 

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर

सोलापूर( संजीव भांबोरे) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी भरती टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावे अन्यथा 17 मार्च 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रदेश युवा मोर्चा सचिव भाई नितीन काळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना दिलेल्या लेखी निवेदनातून केलेली आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती कर्मचारी टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावे यासाठी भारतीय जनता पक्षाचे मंदिर समिती मध्ये कर्मचारी भरतीसाठी कंत्राटी पद्धतीने निविदा काढण्याचा ठराव केला आहे .त्या निविदा केलेल्या ठरावाची वार्षिक अंदाजे 4 कोटी 44 लाख रुपये एवढ्या मोठ्या खर्चाचे निविदा काढली आहे.परंतु सध्या मंदिर समिती मध्ये कार्यरत असणारे हंगामी कर्मचारी आहेत. त्या वेतना मध्ये काम करण्यास तयार असुन त्यांच्या वेतनाचा वार्षिक खर्च हा 2 कोटी रुपये आहे. वास्तविक पाहता सध्या मंदिर समितीचे सध्याचे कर्मचारी आपली सेवा अत्यंत प्रामाणिक पणे बजावत आहेत. त्यामूळे नवीन टेंडर प्रक्रिया राबविल्यास या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे. यासाठी मंदिर समितीला कोणत्याही प्रकारचे टेंडर काढण्याची आवश्यकता नाही.याचबरोबर मंदिरात बाहेरील एजन्सी कडुन बाहेरील कामगार नियुक्ती केले जाऊ शकतात हे होऊ नये असे नितीन काळे यांनी सांगितले. मंदिर समिती अन्याय करणार नाही आणि केल्यास आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करून टेंडर तात्काळ रद्द करू असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडेही मागणी करणार आहे संबंधित विभागाने या संदर्भात बैठक लावुन तात्काळ योग्य असा निर्णय घ्यावा असेही काळे यांनी सांगितले.