अखेर नितीन काळे यांच्या अनेक महिन्यांच्या प्रयत्नाला यश.

संस्थेला एक लाख रुपये चा दंड

अखेर नितीन काळे यांच्या अनेक महिन्यांच्या प्रयत्नाला यश.

अखेर नितीन काळे यांच्या अनेक महिन्यांच्या प्रयत्नाला यश.

. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला लाडु प्रसाद पुरवठा करणाऱ्या यशोधरा महिला संस्थेचा ठेका अखेर रद्द..

समाजसेवक नितीन काळे यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला लाडू प्रसाद पुरवठा करणाऱ्या यशोधरा महिला संस्थेच्या विरोधात मापात पाप करून लाखो भाविक भक्तांची फसवणूक या संस्थेने केली होती.. याच्या विरोधामध्ये नितीन काळे यांनी वारंवार आंदोलने उपोषणे देखील केली होती.. त्यांनी सातत्य पाठपुरावा ठेवल्यामुळे अखेर नाशिक येथील यशोधरा महिला संस्थेचा ठेका रद्द करण्यात आला आहे. यामुळे लाखो भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून समाजसेवक नितीन काळे यांनी सातत्य ठेवून पाठपुरावा करून अखेर यश मिळवले याच्याबद्दल नितीन काळंचे सर्वत्र कौतुक होत असून होणारी फसवणूक थांबलेली आहे.. या संस्थेने मापात पाप करून भाविक भक्तांना कमी वजनाचा लाडू पुरवठा करत असल्याचे नितीन काळे यांच्या निदर्शनास आले होते त्यानंतर त्यांनी प्रांत कार्यालय पंढरपूर येथे उपोषणाचे हत्यार उगारले होते..व संस्थेला एक लाख रुपये चा दंड देखील वजन माप विभागाकडून झाला होता. पण मंदिर समितीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नव्हती पण अखेर नितीन काळे यांनी सतत सातत्य ठेवले असल्यामुळे व मंदिराचेही आर्थिक नुकसान होत असल्यामुळे वारी कालावधीमध्ये यशोधरा महिला संस्था लाडू पुरवठा करू शकली नाही त्यामुळे त्याचा फटका मंदिर समितीलाही बसला होता त्याचाच एक भाग म्हणून अखेर टेंडर रद्द करण्यात आले...