पंढरपूर नगर परिषद आणि विविध सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने एक तास एक साथ स्वच्छता श्रमदान अभियान संपन्न.
एक तास एक साथ स्वच्छता मोहीम
पंढरपूर नगर परिषद आणि विविध सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने एक तास एक साथ स्वच्छता श्रमदान अभियान संपन्न.
महात्मा गांधी जयंतीच्या पूर्व संध्येला केंद्र शासन व राज्य शासनाने आज संपूर्ण देशात आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये स्वच्छता ही सेवा अंतर्गत एक तास एक साथ स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज पंढरपूर नगर परिषदेने प्रशासक गजानन गुरव व मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या मदतीने शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानाची सुरुवात मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सोमनाथ आवताडे पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर , पक्षनेते अनिल अभंगराव, माजी नगरसेवक डी राज.सर्वगोड, क्रीडाई चे अध्यक्ष अमित शिरगावकर, श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संदीप मांडवे त्यांचे सहकारी यांच्यावतीने शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व सिंहगड पब्लिक स्कूल, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने नदीपात्रामध्ये स्वच्छता करण्यात आली तसेच पोलीस प्रशासन च्या वतीने उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्शनाखाली पोलीस कॉलनी येथे स्वच्छता करण्यात आली क्रीडाई या संस्थेने गजानन महाराज मठ स्टेशन रोड येथे स्वच्छता केली तसेच पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्व सफाई कर्मचारी यांनी शहरात विविध ठिकाणी स्वच्छता केली. नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफाळा या भागातील स्वच्छता केली यावेळी मर्चंट बँकेचे संचालक संजय जंवजाळ पांडूरंग हायट्स डेव्हलपर चे नितीन कचरे, भाजपचे नेते सुरेश खिस्ते, नितीन कारंडे,बादल ठाकुर, जनसंपर्क अधिकारी अस्मिता निकम,आबा पाटील.,राहुल गावडे,नवनाथ शिंदे,अभिजित मोरे शहरातील अनेक सामाजिक संघटना या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होत्या . वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य अधिकारी शरद वाघमारे व नागनाथ तोडकर,अभिजित घाडगे सर्व सफाई कर्मचारी मुकादम शिपाई यांनी विशेष परिश्रम घेतले