रत्नागिरीच्या सरस्वती ठसाळेकडून श्री विठ्ठलाच्या दानपेटीत 50 हजाराची देणगी.

भाविकांची गर्दी वाढत आहे

रत्नागिरीच्या सरस्वती ठसाळेकडून श्री विठ्ठलाच्या दानपेटीत 50 हजाराची देणगी.

रत्नागिरीच्या सरस्वती ठसाळेकडून श्री विठ्ठलाच्या दानपेटीत 50 हजाराची देणगी.

पंढरपूर (ता.16) – श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस श्रीमती सरस्वती राजाराम ठसाळे या दानशुर भाविकाने रूपये 50 हजार इतकी देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा मंदिर समितीचे कर्मचारी श्री.योगेश कागदे यांच्या शुभहस्ते श्रींचा फोटो, उपरणे, लाडू प्रसाद देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. श्रीमती ठसाळे ह्या गोपाळकृष्णवाडी, पाग चिपळूण जि. रत्नागिरी येथील रहिवाशी आहेत. आज त्या कुटुंबासमवेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी देणगी दिली आहे.सध्या माघ यात्रेचा कालावधी सुरू असून, भाविकांची गर्दी वाढत आहे. दि.20/02/2024 रोजी जया एकादशी म्हणजे माघ यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेत होणारी गर्दी विचारून घेऊन कायमस्वरूपी 4 देणगी कक्षा व्यतिरिक्त जादा 20 कक्ष उभारण्यात येत आहेत. याशिवाय, मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावर, QR CODE व RTGS द्वारे देणगी जमा करण्याची सोय असल्याचे विभाग प्रमुख श्री.पांडूरंग बुरांडे यांनी सांगीतले.