विठ्ठलाचे ताबडतोब  दर्शन घडवून आणण्यासाठी  पैसे मागणाऱ्या बडवे, उत्पातावर गुन्हा दाखल 

घडले प्रकाराची पुदलवाड यांनी पुर्ण खात्री केली.

विठ्ठलाचे ताबडतोब  दर्शन घडवून आणण्यासाठी  पैसे मागणाऱ्या बडवे, उत्पातावर गुन्हा दाखल 

विठ्ठलाचे ताबडतोब  दर्शन घडवून आणण्यासाठी  पैसे मागणाऱ्या बडवे, उत्पातावर गुन्हा दाखल 

पंढरपूर : विठ्ठलाचे जलद दर्शन घडवून भाविकांकडून पैसे घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सागर बडवे व शंतनु उत्पात (दोघे रा. पंढरपूर) यांच्या विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बडवे व उत्पात यांनी तुळशीपुजेचे निमित्त करून समितीचे व्यवस्थापकांची भेट घेतली अन् महिला सुरक्षा रक्षक यांना रावसाहेबांनी दोन इसमांना दर्शनास सोडण्यास सांगितले आहे. असे खोटे सांगुन दोन इसमांना दर्शनास सोडण्याचा प्रयत्न करुन समितीच्या कर्मचाऱ्याची फसवणुक केली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर समितीचे सुरक्षा रक्षक विभाग प्रमुख चंद्रकांत धर्मान्ना कोळी (वय ५६) हे २ ऑगस्ट रोजी मंदिरात काम करत असताना सकाळी अकरा वाजता मंदिर परिसरात राहणारे सागर बडवे व शंतनु उत्पात हे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे आले.

त्यापैकी सागर बडवे हा व्यवस्थापक पुदलवाड साहेब यांच्या केबिनमध्ये जाऊन समोरील लोकांना तुळशीपुजा करावयाची आहे. असे सांगितल्याने पुदलवाड यांनी त्यांना नित्योपचार विभागाकडुन तुळशी पुजा करावयाची परवानगी घेण्यास सांगितले. तुळशीपुजेची पावती न करता सागर बडवे व शंतनु उत्पात हे विठ्ठल सभा मंडप येथे दोन इसमांना घेऊन आले. व महिला सुरक्षा रक्षक प्रज्ञा वट्टमवार यांना सांगितले की, रावसाहेबांनी या दोन इसमांना दर्शनास सोडण्यास सांगितले आहे. असे सांगुन त्यांनी त्या दोन इसमांना दर्शनरांगेत प्रवेश दिला. ते दोन इसम आतमध्ये गेल्यानंतर तो प्रकार सीसीटीव्ही कर्मचारी प्रकाश पाटील यांचे लक्षात आल्याने बीडीडीएस पोलीस कर्मचारी वामन यलमार, महिला सुरक्षा कर्मचारी प्रज्ञा वट्टमवार या सर्वांनी मिळुन त्यांना दर्शनाला न सोडता परत कार्यालयात आणुन व्यवस्थापक पुदलवाड यांच्या समक्ष त्यासर्वाकडे विचारपुस केली. यावेळी तुळशी पुजेचे नाव पुढे करुन त्यांच्यासोबत असलेले इसम हे व्हीआयपी नसताना व तुळशीपुजेची अधिकृत परवानगी न घेता त्यांना लोभापोटी दर्शनास सोडण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता दर्शन रांगेत प्रवेश करणाऱ्या इसमांची नावे विनोद उपुतला व शिरीशा विनोद उपुतला (रा. चिंतल राज्य हैदराबाद) अशी असुन त्यांनी प्रत्येकी १ हजार रुपये दर्शनासाठी असे एकूण २ हजार रुपये देण्याचे ठरल्याचे सांगितले आहे. हा घडले प्रकाराची पुदलवाड यांनी पुर्ण खात्री केली. यानंतर चंद्रकांत कोळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे

एका हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरवरील व्यवस्थापकास विठ्ठलाचे व्हीआपपी दर्शन मिळेल का असे विचारले. त्यावर त्या व्यवस्थापकाने कोणास तरी फोन करून व्हीआपपी दर्शन मिळेल असे सांगून संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर दिला. त्या नंबरवर विनोद यांनी फोन केला, व दर्शनासाठी किती पैसे लागतील असे विचारलं. त्यावेळी समोरील व्यक्तीने ३ हजार रुपये लागतील असे सांगितले. काही तर कमी करा म्हणून दोन व्यक्तीच्या दर्शनासाठी २ हजार रुपये ठरले. अशी कुजबूज शहरात सुरू आहे.