भैरवनाथ विद्यालय व वसंतराव काळे क.महाविद्यालय  आढीव येथे भोगी व मकर संक्रांत निमित्त बाजार डे

मुलांनी आपापल्या शेतातून आणलेला भाजीपाला, कांदे, बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबिर,

भैरवनाथ विद्यालय व वसंतराव काळे क.महाविद्यालय   आढीव येथे भोगी व मकर संक्रांत निमित्त बाजार डे

भैरवनाथ विद्यालय व वसंतराव काळे क.महाविद्यालय

 आढीव येथे भोगी व मकर संक्रांत निमित्त बाजार डे भरवण्यात आला.

प्रशालेतील प्रांगणात बाजार डे भरवण्यात आला.

पंढरपूर दिनांक 13 जानेवारी ( विष्णू राजगुरू )पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे मुलांना व्यवहार ज्ञान देण्यासाठी शाळेत"भोगी व मकर संक्रांत" निमित्त प्रशालेतील प्रांगणात बाजार डे भरवण्यात आला होता. विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार ज्ञान, दैनंदिन गरजांचे महत्त्व आदी गोष्टी समजाव्या यासाठी प्रात्यक्षिकाच्या रूपाने आज बाजार डे नियोजन करण्यात आले होते. तरी मुलांनी आपापल्या शेतातून आणलेला भाजीपाला, कांदे, बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबिर, मटकी,वांगी, पालक, मेथी, गवार यासह खाद्यपदार्थांपैकी भेळ, वडा-पाव, बिस्कीट, इडली-सांबार चहा स्टॉल, किराणा स्टॉल हॉटेल स्टॉल आदी दुकाने शाळेच्या आवारात असे विविध पदार्थ घेऊन बसली होती. व बाजारातून होणारी पैशांची देवाण घेवाण, भावातील कमी जास्त तफावत, मालाचा दर्जा आदी बाबी विद्यार्थी समजून सांगण्याबरोबर मालक व गिर्‍हाईक यांच्यात पैशांवरून होणारी घासाघीस, हमरीतुमरी, बाजारातील गर्दीचाही अनुभव विद्यार्थी घेत होते. शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्साह व चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता तर एकीकडे खरेदी करण्यासाठी पालकांनी व आढीव मधील ग्रामस्थांनी भेट देऊन मुलांचे कौतुक केले व पालेभाज्या फळे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली बाजार भरविण्यासाठी मुख्याध्यापक शेंडगे सर नागणे सर जाधव सर काळे सर युवराज काळे सर एलमार सर झिरवळे सर माळी सर जकाते सर व सर्व शिक्षक वर्ग आदींनी परिश्रम घेतले.