प्रभुपाद घाटाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

पंढरपूर- येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कान) यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या प्रभूपाद घाटाचे लोकार्पण

प्रभुपाद घाटाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

प्रभुपाद घाटाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्प

पंढरपूर- येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कान) यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या प्रभूपाद घाटाचे लोकार्पण व भुवैकुंठ मंदिराचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते आषाढी एकादशीस १० जुलै रोजी पहाटे ५ वाजता होणार आहे.

चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर असणार्‍या इस्कान मंदिर येथे आयोजित परिषदेत प्रल्हाद दास व श्यामसुंदर शर्मा यांनी सदर माहिती दिली. इस्कॉनच्या वतीने चंद्रभागा नदीवर भव्य प्रभुपाद घाट उभारण्यात आला असून याचा लोकार्पण सोहळा कोरोनामुळे रखडला होता. तसेच इस्कॉनच्या जागेतच भव्य भूवैकुंठ मंदिराचे भूमिपूजन देखील केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे. एकादशीस शासकीय महापूजा झाल्यानंतर पहाटे पाच वाजता सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे चंद्रभागेची आरती देखील करणार आहेत.

यावेळी खासदार डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सद्गुरू कारखान्याचे अध्यक्ष एन.शेषगिरी राव, डी.वाय.पाटील विद्यालयाचे कुलपती पी.डी.पाटील त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.