पंढरपूर येथील35 वर्षाचा तरुण चंद्रभागा नदी पात्रात पाण्यातील नारळ काढताना गेला वाहून

शेट्टी ज्ञानोबा बंदपट्टे वय वर्ष 35 राहणार पद्मावती झोपडपट्टी पंढरपूर

पंढरपूर येथील35 वर्षाचा तरुण चंद्रभागा नदी पात्रात पाण्यातील नारळ काढताना गेला वाहून

पंढरपूर येथील महाद्वार  घाटावररुन येथील 35 वर्षाचा तरुण पाण्यातील नारळ करताना गेला वाहून.

पंढरपूर येथील शेट्टी ज्ञानोबा बंदपट्टे वय वर्ष 35 राहणार पद्मावती झोपडपट्टी पंढरपूर येथील असून हा रोज पहाटे सहा वाजता येथील महादार घाटावर अंघोळ करण्यासाठी गेला होता. परंतु श्रावण महिना असल्यामुळे येणारे भावीक चंद्रभागेच्या पात्रामध्ये नारळ चोळी म्हणून चंद्रभागेला अर्पण करतात सोडण्यात आलेला नारळ काढण्यासाठी हा तरुण पाण्यात गेल्याने पाण्याचा प्रवाह जोराने असल्याने तो पाण्यामध्ये वाहून गेला आहे.

आज रविवार दिनांक 14 ऑगस्ट 22 रोजी हा नेहमीप्रमाणे सकाळी घरातून सहा वाजता चंद्रभागा नदी गेला होता.

आंघोळीला जाण्यापूर्वी त्यांनी त्याच्या पायातील चप्पल एका नारळ विक्रेते महिलेजवळ सोडली होती. आंघोळ करून लगेच येणाऱ्या व्यक्ती हा नदीकडून घाटावर पुन्हा आलाच नाही हे तेथील सर्वांच्या लक्षात आले तसेच काही लोकांनी तो पाण्यात बुडाल्याचे आणि वाहत गेले चे बघितले आहे परंतु त्या ठिकाणचे कोणीही सांगण्यास तयार नाहीत.

ही घटना आज रविवार दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 वाजता घडली असल्याचे समजते.

 शेट्टी न्यानोबा बंदपट्टे यांची पत्नी रोज येणारा आपला पती आज आला नसल्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली परंतु तिलाही तो आंघोळीला नदीपात्रात गेल्यानंतर पुन्हा घाटावर आला नाही तो बुडून वाहत गेला असावा असे तेथील काही लोकांनी दबक्या आवाजात सांगितले.

त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पतीची वाट पाहून अखेर तिने पंढरपूर शहर पोलीस ठाणे गाठले .

सदर पत्नी वैशाली ज्ञानबा बंद पट्टे वय 40 राहणार पद्मावती झोपडपट्टी पंढरपूर हिने शहर पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याचे मिसिंग दाखल केली आहे. सदर मिसिंग व्यक्तीच्या अंगात बदामी रंगाची पॅन्ट व त्याच्या छातीवर आणि हातावर गोंदले आहे. सदर मिसिंग चा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत.