पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी याकडे लक्ष देतील काय?
यावर्षी गतवर्षीपेक्षा अधिक म्हणजे बारा ते चौदा लाख वारकरी भाविक पंढरी त दाखल होतील असा अंदाज नागरिक व भाविकातून व्यक्त केला जात आहे.
पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी याकडे लक्ष देतील काय
पंढरपूर दिनांक 2 जुलै. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष पंढरपूर आषाढी यात्रा आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन ही वारकरी भाविकांसाठी बंद होते त्यामुळे यावर्षी गतवर्षीपेक्षा अधिक म्हणजे बारा ते चौदा लाख वारकरी भाविक पंढरी त दाखल होतील असा अंदाज नागरिक व भाविकातून व्यक्त केला जात आहे.
पंढरपूर शहरातील अनिल नगर. मांडव खडकीपंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी याकडे लक्ष देतील काय?व्यास नारायण या परिसरातून चंद्रभागा नदीवर स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी भाविक जात असतात परंतु सध्या या परिसरातील नदीवर जाणाऱ्या रस्त्यावर मोठ-मोठी काटेरी झाडे झुडपे वाढली असल्याने रस्त्यावर आली आहेत. आषाढी यात्रा केवळ आठ दिवसात येऊन ठेपली असून आईनिवेल चंद्रभागा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाविकांना मोठी कसारत व अडचण निर्माण होईल तेव्हा नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी स्वतः पाणी करून याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे भाविकातून बोलले जात आहे.
चंद्रभागा नदी काठावर सध्या काटेरी मोठमोठी झाडे झुडपे वाढले आहेत भाविकांना स्नान करण्यासाठी जागा शिल्लक उरलेली नाही नेमकी याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी भावी मठांची संख्या आहे. त्याचबरोबर अशा काटेरी झाडाझुडपाचा आधारभुरटे चोर दडण्यासाठी करतात त्यामुळे चंद्रभागा नदी काठावर गेलेल्या वारकरी भाविकांच्याछोट्या-मोठ्या चोऱ्या होतात. तेव्हा या रस्त्यावरील नदी काठावर असणारी झाडे जुडपे काढणे आवश्यक आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या पश्चिमेकडून मांडव खडकी पासून चंद्रभागा नदीवर जाणाऱ्या रस्त्यावर दोन मोठे चेंबर रस्त्याच्या मध्यभागी असून एक फूट जमिनी च्या वर आहेत. त्यामुळे या ठिकाणी मुरूम टाकावा लागणार आहे.
कोरोना काळानंतर यावर्षी पंढरपूर येथील विविध कार्यालय प्रशासनामध्ये बरेच अधिकारी यांनी नव्याने पदभार स्वीकारला आहे त्यापैकी पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अरविंद माळी हे आहेत त्यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या पदभार घेतल्यापासून त्यांचे कामकाज सुरळीत व व्यवस्थित सुरू आहे परंतु आषाढी वारी व वारकरी भाविकांच्या दृष्टीने याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.