केंद्र सरकारचा पंढरपूर काँग्रेसकडून निषेध.

भाजपा सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार

केंद्र सरकारचा पंढरपूर काँग्रेसकडून निषेध.

केंद्र सरकारचा पंढरपूर काँग्रेसकडून निषेध.

 पंढरपूर दि.24 जानेवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आसाम मधील न्याय यात्रेवर झालेल्या पोलीस लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्या वरील ईडी कारवाईच्या निषेधार्थ पंढरपूर काँग्रेसच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आली.

भाजपा सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते द. बडवे, काँग्रेस शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, काँग्रेस जि.उपाध्यक्ष सुहास भाळवणकर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष संदीप शिंदे, शहर चिटणीस महेश आधटराव, किसान सेल तालुकाध्यक्ष अक्षय शेळके, अल्पसंख्यांक सेलचे शकील रत्नपारखी, माळशिरस काँग्रेसचे सचिन हजारे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे संतोष ताठे आदींसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.