पंढरपुरात भिंत पडून चारजण वारकरी भाविक जखमी

पैकी दोन तरुण मुली व दोन वयोवृद्ध पुरुष

पंढरपुरात भिंत पडून चारजण वारकरी भाविक जखमी
पंढरपुरात भिंत पडून चारजण वारकरी भाविक जखमी

पंढरपुरात भिंत पडून चारजण वारकरी भाविक जखमी 

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. 

जखमी झालेल्या पैकी दोन तरुण मुली व दोन वयोवृद्ध पुरुष असून चारही जखमीवर सध्या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे.

पंढरपूर दिनांक 15 जुलै सध्या पंढरपूर आषाढी यात्रा एकादशी सोहळा याकरिता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी भावीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत येतात असेच आज तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथील काही वारकरी भाविक पंढरपूर येथे आले असता पंढरपूर शहरातील शनि मंदिराच्या पाठीमागे शिंदे यांचे घरी हे मुकामासाठी उतरले होते. त्यानंतर रात्रीचे जेवण तयार करून दोन मुली व दोन पुरुष 10/45वाजता जेवायला बसले होते . त्यावेळी सिमेंट विटाची असणारी भिंत रिमझिम पावसामुळे बिजली असल्यानेअचानक चौघाच्या अंगावर पडली या चौघांना ही जबर मुक्कामार लागला असून एका पुरुषाच्या तोंडालाही खरचटले आहे. सदरची घटना सोमवार दि.15जुलै रोजी रात्री 10:45 वाजता उघडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच तेथील लोकांनी 108 ॲम्बुलन्सला व्ह्यान फोन करून बोलावून घेतले व त्यांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. 

पंढरपूर येथे गेली तीन ते चार तासापासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने निकृष्ट झालेली भिंत पावसाने भिजल्याने अचानक जेवायला बसलेल्या चौघांच्या अंगावर पडली आहे. यामध्ये चारजण जखमी झाले आहेत यामध्ये सख्ख्या बहिणी प्रियांका व अर्पिता पांडुरंग हेलकुडे वय वर्षे अंदाजे 18 ते 20 . तसेच वयोवृद्धा आचारी बापू माळी वय वर्ष 65आणि बिपिन ससुंदे वय वर्ष 55 असे चौघेजण भिंत पडून जखमी झाले आहेत. हे सर्व राहणार तालुका निपाणी जिल्हा बेळगाव येथील वारकरी भावीक आहेत.पंढरपूर येथील शनी मंदिर पाठीमागे शिंदे यांच्या घरी लोकांसाठी उतरले होते . पंढरपूर नगरपरिषदेने सदरचे घर इमारत राहण्यास धोकादाय असल्याची शिंदे यांना नोटीस बजावली होती का? हा प्रश्न सध्या उपस्थित होत असून या घटनेला जबाबदार कोण? पंढरपूर नगरपरिषद का इमारत मालक शिंदे आहेत हे पाहणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांतून बोलले जात असून नगरपरिषद संबंधितावर काय कारवाई करणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.