पंढरपूर येथे दिव्यांग शिबिराचे आयोजन

महसूल विभाग, पंचायत समिती पंढरपूर तसेच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या संयुक्त

पंढरपूर येथे दिव्यांग शिबिराचे आयोजन

पंढरपूर येथे दिव्यांग शिबिराचे आयोजन

 पंढरपूर (दि.१८) :- पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक 19 व 20 ऑगस्ट 2024 रोजी महसूल विभाग, पंचायत समिती पंढरपूर तसेच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश सुडके यांनी दिली.

  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित केले असून यामध्ये मेंदू, हात व पाय, डोळे, कान व इतर सर्व व्यंगांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे. या तपासणी शिबिरात सोलापूर येथील तज्ञ डॉक्टर तसेच वैश्यपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश सुडके यांनी केले आहे.  तसेच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील आयोजित शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही डॉ.सुडके यांनी यावेळी सांगितले