मंगळवेढा तालुक्यातील अखेर तोतिया शिक्षक मोहन शिंदे यांची शिक्षक मान्यता रद्द.

मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील त्रिमूर्ती विद्या विकास मंडळ

मंगळवेढा तालुक्यातील अखेर तोतिया शिक्षक मोहन शिंदे यांची शिक्षक मान्यता रद्द.

मंगळवेढा तालुक्यातील अखेर तोतिया शिक्षक मोहन शिंदे यांची शिक्षक मान्यता रद्द.

तब्बल 28 वर्षानंतर शिक्षक मान्यता रद्द केल्याने शिक्षण संस्था चालकांचे धाबे दणाणले.

पुणे. संगम विद्यालय डोंगरगाव तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या प्रशालेतील तृतीय शिक्षक मोहन तुकाराम शिंदे यांची नियमबाह्य व चुकीची शिक्षक मान्यता पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दि.१०/५/२०२३ च्या आदेशानुसार तब्बल 28 वर्षानंतर करण्यात आले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील त्रिमूर्ती विद्या विकास मंडळ जिल्हा सोलापूर ही संस्था सन 1990 पासून डोंगरगाव येथे संघ विद्यालय नावाची माध्यमिक प्रशाला चालवते. संस्थेने सन 1993 मध्ये डी के साखरे यांना दोन वर्षाच्या परीक्षाधीन कालावधी करिता नेमणूक केली होती त्यानंतर मोहन तुकाराम शिंदे यांना सन 1995 ते1996 या एकाच वर्षाकरिता अर्धवेळ शिक्षक म्हणून नेमणूक दिली होती. परंतु तत्कालीन शिक्षणाधिकारी रामचंद्र जाधव यांनी शिंदे यांना दिनांक 5 /1 /1996 च्या पत्रा नवे नियमबाह्य व चुकीचे शिक्षक मान्यता दिली. मान्यतेच्या आधारे संस्थेने डी के साखरे यांना प्रशालेच्या मंजूर सेवक संचार त्याचे पद शिल्लक असताना पद संपुष्टात आल्याचे खोटे कारण पुढे करून त्यांना सेवा समाप्तीचा आदेश दिला. सन 1995 ते 96 या वर्षानंतर संस्थेने श्री मोहन शिंदे यांना कसल्याही प्रकारचे नेमणुकीचे आदेश दिले नाहीत त्यामुळे श्री शिंदे हे सन 1996 ते 97 पासून संस्थेचे कसलेच कर्मचारी नसून त्यांना दिनांक 5/1/ 1996 च्या पत्राने दिलेली शिक्षक मान्यता रद्द करण्यात यावी अशी तक्रार श्री डी के साखरे यांनी शिक्षण उपसंचालक श्री उकिरडे यांच्याकडे केले होती. दिनांक २/५//२०२३ रोजी श्री उकिरडे यांनी त्यांच्या जालना आयोजित केलेल्या सुनावणी मध्ये सन 1995 ते 96 नंतर श्री मोहन शिंदे यांना संस्थेने कसल्याही प्रकारचे नियुक्ती आदेश दिले नाहीत हे संस्था अध्यक्ष नाना उन्हाळे संस्था सहसचिव भीमराव मोरे संचलक शिवाजी उन्हाळे मुख्याध्यापक राजेंद्र नलवडे व स्वतः मोहन शिंदे यांनी स्पष्टपणे चालकांनी जातीय मानसकतेतून प्रशालेतील मागासवर्गीयांना शंभर बिंदू नामावलीप्रमाणे भरला नसून संस्था चालक व मुख्याध्यापक यांनी शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा आहार करून शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे त्यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे त अशी आपली बाजू मांडताना साखरे यांनी त्यांचे म्हणणे सादर केले. शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन दिनांक 23/ 8/ 2017 च्या निर्णयानुसार शिंदे यांची नियमबाह्य व चुकीची शिक्षक मान्यता रद्द केल्याचे आदेश पारित केले आहेत. तब्बल 28 वर्षानंतर शिंदे यांची नियमबाह्य व चुकीची शिक्षक मान्यता रद्द केल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली असून भ्रष्ट संस्थाचालकांचे व मुख्याध्यापकांचे धाबे दणाणले आहेत.