पंढरपूर नगर परिषद 65एकरातील रस्त्यावर वाहणारे पाणी थांबवा मगच रस्ता दुरुस्त करा

नगर परिषद मुख्य अधिकारी यांनी जातीने लक्ष घालणे गरजेचे

पंढरपूर नगर परिषद 65एकरातील रस्त्यावर वाहणारे पाणी थांबवा मगच रस्ता दुरुस्त करा

पंढरपूर नगर परिषद 65एकरातील रस्त्यावर वाहणारे पाणी थांबवा मगच रस्ता दुरुस्त करा

पंढरपूर दि.5जून पूर्वी आषाढी कार्तिक व अन्य यात्रा वाळवंटात भरत होत्या परंतु वाळवंट हे यात्रा काळात घाण केले जात होते.त्यामुळे उच्च न्यायालय आदेश व शासनाने पंढरपूर येथील नगर परिषदेच्या ताब्यात आसणारे 65एकर या ठिकाणी गेली 5/6 वर्षापूर्वी तत्कालीन सोलापूर जिल्हाधिकारी श्री एकनाथ मुंडे असताना त्यांनी ठोस निर्णय घेऊन राज्यातील येणाऱ्या संतांच्या पालख्या व वारकरी भाविकांच्या सोयीसुविधाचे महत्व म्हणून 65 एकरामध्ये महाराष्ट्रातील सर्व संतांच्या दिंड्या पालख्या येणाऱ्या यांची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. या ठिकाणी दिंड्या पालख्यांचे मोठे तळ ठोकले जातात. वारकरी भाविक या ठिकाणी किर्तन भजन ,प्रवचन, कार्तिक व आषाढी एकादशी सोहळा असतो त्यावेळी वारकरी भाविक व दींड्या पालख्यां यांचा सहा ते सात दिवस 65 एकरामध्ये मुक्काम असतो.

65 एकरातील अंतर्गत असणारा डांबरी रस्ता आहे तो दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात खचून उखडला आहे. त्याचे कारण म्हणजे पाणी टँकर भरण्यासाठी त्या ठिकाणी चार इंची पाईपलाईन केली आहे. ते पाणी भरल्यानंतर पाणी शेजारील डांबरी रस्त्यावर येऊन हा रस्ता खचून खराब झालेला आहे. सदर या पाण्याला दुसरीकडून बाहेर काढून देणे गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी अनेक वेळा पाण्याचे टँकर भरले जातात हे मुख्य अधिकारी यांना माहिती आहे का येथे भरले जाणाऱ्या पाणी टँकरचे पैसे घेतले जातअसल्याची माहिती समजली आहे. सध्या केवळ पाण्यामुळे 65एकरातील अंतर्गत रस्ता निकृष्ट झालेला असल्याने दोन ठिकाणचा डांबरी रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.

 परंतु रस्त्यावर येणाऱ्या पाण्याला बाहेर काढून न दिल्यामुळे पाणी सध्या रस्त्यावर येत आहे. रास्ता करुनही लवकरच उखडणार आणि खराब होणार आहे. त्यामुळे रस्त्यासाठी खर्च होणारी रक्कम पाण्यात जाणार आहे.त्यामुळे या बाबतीत नगर परिषद मुख्य अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून चांगला रास्ता करून घ्यावा असे वारकरी भाविक व येथील नागरिकांतून बोलले जात आहे.