खंडग्रास चंद्रग्रहणामुळे श्रींच्या नित्योपचारात व दर्शनाच्या वेळेत बदल

ग्रहण स्पर्श रात्रौ 01.05, मध्य रात्रौ 01.44 व मोक्ष रात्रौ 02.23 वाजता

खंडग्रास चंद्रग्रहणामुळे श्रींच्या नित्योपचारात व दर्शनाच्या वेळेत बदल

*खंडग्रास चंद्रग्रहणामुळे श्रींच्या नित्योपचारात व दर्शनाच्या वेळेत बदल

कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके 

पंढरपूर (ता.26) :- आश्विन शुध्द 15, शनिवार दि.28 ऑक्टोबर, 2023 रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आपल्या देशात दिसणार असल्याने श्रींच्या नित्योपचारामध्ये व दर्शनाच्या वेळेत दि.29 ऑक्टोंबर, 2023 रोजी बदल होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शेळके व सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ औसेकर यांनी दिली.त्यामध्ये ग्रहणाचे वेध दि.28/10/2023 रोजी दु.03.14 पासून दि.29/10/2023 रोजी प.2.23 पर्यंत राहतील. ग्रहण स्पर्श रात्रौ 01.05, मध्य रात्रौ 01.44 व मोक्ष रात्रौ 02.23 वाजता आहे. त्यामुळे ग्रहण स्पर्श (रात्रौ.01.05 मि.) झालेनंतर व ग्रहण मोक्ष (रात्रौ 02.23 मि.) झालेनंतर श्री. विठ्ठल व श्री. रूक्मिणी मातेस, सर्व परिवार देवतांना श्री. चंद्रभागा (भीमा) नदीचे पाणी आणून स्नान घालण्यात येणार आहे. 

तसेच दि.28/10/2023 रोजी रात्रौ 11.00 ऐवजी 1.00 पर्यंत दर्शन सुरू राहील व तदनंतर शेजारती रात्रौ 12.00 ऐवजी पहाटे 3.00, काकडा आरती पहाटे 4.00 ऐवजी 5.00 वा., व दर्शन सकाळी 6.00 ऐवजी 7.00 वाजता सुरू होणार आहे.कृपया सदर बदलाची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.