सांगोला व पंढरपूर तालुक्यातील ओबीसी आरक्षण संदर्भात ओबीसी समाज आक्रमक.

सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी समाज आक्रमक.

सांगोला व पंढरपूर तालुक्यातील ओबीसी आरक्षण संदर्भात ओबीसी समाज आक्रमक.

सांगोला व पंढरपूर तालुक्यातील ओबीसी आरक्षण संदर्भात ओबीसी समाज आक्रमक.

उद्या सांगोला व पंढरपूर बंदची हाक.

ओबीसी नेते प्राचार्य लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकारी यांनी सुरू केलेल्या आंदोलनास जवळजवळ सात ते आठ दिवस होऊन गेले आहेत. गेले आठ दिवसापासून लक्ष्मण हाके यांनी अन्न पाणी न घेतल्यामुळे लक्ष्मण हाके यांचे प्रकृती खालवली आहे. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण संदर्भात लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकारी यांनी वडोगोद्री जिल्हा जालना येथे गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या चार दिवसापूर्वी भाजपाचे नूतन खासदार संदिपान भुमरे यांनी भेट देऊन आपल्या मागण्या भाजपचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवू असे आश्वासन दिले .भाजपाच्या पंकजाताई मुंडे यांनी वडगोद्री येथे उपोषणाच्या ठिकाणी जाऊन हाके व त्यांच्या सहकार्याची विचारपूस करून भाजप सरकार कडे एका पत्राद्वारे स्पष्ट आपली भूमिका मांडावी असे पत्र पाठवले आहे. परंतु भाजप आतापर्यंत कोणताही निर्णय न घेतल्याने ओबीसी समाजाने उद्या 21 जून रोजी सांगोला व पंढरपूर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांना ओबीसी आरक्षण संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे त्यांना आपण भेटायला जाणार का असा सवाल विचारल्यानंतर नाही असे उत्तर देऊन शरद पवार मोकळे झाले. यावर भातखळकर म्हणाले की अहो गेला असता तर हाकेनी तुमच्या ऊर्जेचे कौतुक केले असते. पण साहेब काही बाबतीत प्रचंड स्पष्ट होते आहेत इतका स्पष्ट वक्तेपणा असायला हवा ओबीसी नेत्यांसाठी नाही म्हणजे नाही. अशी पोस्ट फेसबुक वरती अतुल भातखळकर यांनी टाकल्यामुळे ही पोस्ट सध्या फेसबुकवर व्हायरल झाल्याने या पोस्टची सध्या चर्चा जोरात सुरू आहे. बीड मधून भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी लोकसभेमध्ये पराभव पत्करला परंतु माणुसकी जिवंत ठेवत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना भेट दिल्याने समाजामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु सोलापूर लोकसभेमध्ये काँग्रेसच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी ओबीसी समाजाकडे जाऊन मते मागितले त्या निवडून ही आल्या आणि लगेचच त्यांना ओबीसी समाजाचा विसर पडला आहे .त्याचबरोबर माढा मतदारसंघातून लोकसभेसाठी अकलूजचे उमेदवार धर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार पक्षातून तुतारी चिन्ह घेत माढा मतदारसंघातील गावांमध्ये व सांगोला तालुक्यातील काही गावे येत असल्यामुळे सांगोल्यातील ही ओबीसी समाजाची मते घेऊन भरघोस मतांनी निवडून आले त्यानंतर मात्र नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही ओबीसी समाजाला ठेंगा दाखवत नेते लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी गेले नाहीत त्यामुळे खा.मोहिते पाटील व खा प्रणिती शिंदे यांच्यावरआता सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण ओबीसी समाज नाराज झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूक  वेळी ओबीसी समाज नेमकी काय भूमिका घेणार याकडे मात्र अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.