आठ दिवसापासून चारजण व्यक्ती गायब

करमाळा तालुक्यातील आठ दिवसापासून चार व्यक्ती गायब झाले

आठ दिवसापासून चारजण व्यक्ती गायब

आठ दिवसापासून चारजण व्यक्ती गायब

करमाळा तालुक्यातील आठ दिवसापासून चार व्यक्ती गायब झाले आहेत. यामध्ये दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे याची नोंद करमाळा पोलिसात हरवले असल्याची नोंद झाली आहे गायब झालेल्या सर्व व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणांच्या वयो गटातील आहेत. 22 ते 28 जानेवारी दरम्यान सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत 29 व्यक्ती बेपत्ता झाले आहेत त्यात करमाळा पोलिस ठाण्याच्या व्यक्ती बेपत्ता झाल्या असल्याचे नोंद झाले आहे बेपत्ता झालेले व्यक्तीमध्ये 23 तारखेला पोथरे येथून 22 वर्षाचा एक मुलगा हरवला असल्याची नोंद झाली आहे त्यानंतर 26 तारखेला खडकेवाडी येतो 57 वर्षाचा एक पुरुष बेपत्ता झाला आहे. याची नोंद करमाळा पोलिसात हरवली असल्याची झाली आहे याबरोबर तालुक्यातील पूनवर येथून 21 वर्षाची एक मुलगी बेपत्ता झाली असून यांची नोंद करमाळा पोलिसात 27 तारखेला हरवले असल्याची म्हणून झाली आहे तर 28 तारखेला वर कुठे येथून 31 वर्षाची महिला बेपत्ता झाली असल्याची नोंद पोलिसात झाली आहे.