पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. 'एक गौरवशाली शतक देवाच्या चरणी विराम.. आई मध्ये मला ते त्रिमूर्ती नेहमीच जाणवते, ज्यात एका तपस्वीचा प्रवास आहे, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवन आहे', असे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज सकाळी अहमदाबाद येथील रुग्णालयात वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. निधनाचे वृत्त कळताच नरेंद्र मोदी हे तात्काळ अहमदाबादसाठी रवाना झाले आहेत. या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे