आंबे अवनली गोपाळपूर येथील अवैध्य वाळू उपसा आणि भांडण तंटा करणाऱ्या दोन टोळ्या हद्दपार.
आंबे अनवली व गोपाळपूर येथील दोन टोळ्यावर सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई

आंबे अवनली गोपाळपूर येथील अवैध्य वाळू उपसा आणि भांडण तंटा करणाऱ्या दोन टोळ्या हद्दपार
पंढरपूर दि.5 सप्टेंबर.. पंढरपूर पोलीस ठाणे अंतर्गत तालुक्यातील आंबे आणली गोपाळपूर येथील उपद्रवी अवैध वाळू उपसा व मंडळी जमवून मारामारी भांडण तंटा करणाऱ्या आंबे अनवली व गोपाळपूर येथील दोन टोळ्यावर सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यातील १तानाजी शिवाजी शिंदे २बापू शिवाजी शिंदे ३हरी शिवाजी शिंदे ४विशाल बापू शिंदे५ विलास उर्फ विकास बापू शिंदे६ धनाजी उद्धव शिंदे ७शंकर राजाराम शिंदे ८सिद्धू सुरेश नागणे९ आनंद जनार्दन सगर १०बाबासाहेब उर्फ बाबुराव मनोहर जाधव सर्व राहणार आंबे हे वारंवार चोरून अवैध वाळू उपसा करून सुरती वाहतूक विक्री करीत असल्याने त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल आहेत तसेच प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने तसेच त्यांची पंढरपूर पोलीस ठाणे हद्दीत दहशत वाढत चालली होती त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सदर टोळीस सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा सांगोला माळशिरस मोहोळ माढा या तालुक्यातून सहा महिन्याकरिता दिनांक २/९/२२ रोजी हद्दपार आदेश पारित केलेला आहे.
शरीराविषयी व मालाविषयक गुन्हे करणारी टोळी क्र.२ मधील १.बिरू शिवाजी कोकरे.२ सोमनाथ तानाजी बनसोडे.३ शरद शिवाजी गांजाळे हे आणले येथील असून गोपाळपूर येथील ४.प्रवीण अशोक मेटकरी ५.संजय ज्ञानेश्वर गडदे हे पंढरपूर शहर व तालुका पोलीस ठाणे हद्दीत माला विषयक व शरीराविषयीक गुन्हे करून लोकांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्यामुळे सदर टोळीस मा.सोलापूर पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी १ वर्षाकरिता दि.28 /6 /2022 रोजी हद्दपार आदेश पारित केला आहे.
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार सराईत गुन्हेगार टोळीवर अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी प्रस्ताव सादर केल्याने वरील टोळ्या हद्दपार करण्यात आले आहे तरी नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्ती हद्दपार क्षेत्रात आढळून आलेस पोलीस नियंत्रण कक्ष किंवा पोलीस ठाण्यास माहिती कळवावी