अभिजीत पाटलाच्या गटात वाडीकुरोलीच्या या नेत्याचा जाहीर प्रवेश*

कल्याण काळे यांना वाडी कुरोलीत मोठा धक्का

अभिजीत पाटलाच्या गटात वाडीकुरोलीच्या या नेत्याचा जाहीर प्रवेश*

*अभिजीत पाटलाच्या गटात वाडीकुरोलीच्या या नेत्याचा जाहीर प्रवेश

(वाडीकुरोली सरपंच धनंजय काळे यांच्यासह गार्डी, उपरी, पळशीच्या विठ्ठलच्या सभासदांचा जाहीर प्रवेश)

युवा नेते अभिजीत आबा पाटील हे सध्या पंढरपूर तालुक्यातच नाहीतर जिल्हाभर नाव चर्चेत आहे. अगदी कमी वयात तब्बल चार साखर कारखाने यशस्वी चालवत आहेत. कर्जाचा डोंगर झालेल्या आणि बंद अवस्थेत असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या येणाऱ्या निवडणुकीत अभिजीत पाटील हे उतरणार आहेत. अभिजीत आबा पाटील यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून वाडीकुरोली मा.सरपंच धनंजय काळे, विकास सोसायटीचे चेअरमन बाबासो काळे, प्रगतशील बागायतदार अभिमान काळे, बाळासाहेब काळे, नितिन काळे, दत्तात्रय काळे, सचिन काळे यांचा अभिजीत पाटील गटात जाहीर प्रवेश  केला आहे. अभिजीत पाटील यांना विठ्ठलच्या सभासदांचा जबरदस्त पाठिंबा मिळत असून त्यांच्या नावाला एक वलय आणि दबदबा वाढत चालला आहे. तसेच गार्डी पाणीवापर संस्थेचे चेअरमन बाळासाहेब, अच्युतराव पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक तात्यासाहेब ईनामदार, बाळासाहेब साळुंखे, राजेंद्र पवार, धर्मा कांबळे, सचिन सुरवसे यांनी सुद्धा प्रवेश केला आहे .  उपरी गावचे पांडुरंग नागणे , पळशी गावचे प्रगतशील बागायतदार हनुमंत जाधव यासर्वांचा अभिजीत आबा पाटील यांच्या गटामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या प्रत्येक सभासदाचं हित जपत वळेवर  ऊस नेऊन त्यांची वेळच्या वेळी ऊस बील , कामगार पगार आणि तोडणी वाहतूकदाराची बील देण्याचे अभिजीत पाटील यांचे धोरण असणार आहे. पंढरपूरच्या शेतकऱ्यांचा हा राजवाडा आहे, हे ह्या भूमीच गतवैभव आहे आणि शेतकरी सभासद, कामगारांच्या सहकार्याने आपण हे गतवैभव आणि विठ्ठलचे सोनेरी दिवस परत आणूया असा विश्वास अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात अभिजीत पाटील हे तयारीनिशी उतरल्याचे दिसत आहेत. विठ्ठल सह.साखर कारखान्याच्या येणाऱ्या निवडणुकीच्या  तोंडावर सभासदांच्या गाटीभेटी आणि विश्वास संपादन करीत असल्याचे दिसत आहे. सभासदांकडून अभिजीत पाटील याच्या कर्तृत्ववाचा बोलबाला सगळीकडे होत असताना दिसतोय.

वाडीकुरोलीच्या यानेत्याचा गटात प्रवेश झाल्याने पंढरपूरच्या राजकीय  भूकंप झाल्याची चर्चा आता पंढरपूर तालुक्यात होताना दिसत आहे.