श्रींच्या गाभा-यातील मेघडंबरीचे काम पूर्ण* 

लाकडी मेघडंबरीस नांदेड येथील दानशुर भाविकाकडून २ कोटी ४५ लाखाची चांदी अर्पण* 

श्रींच्या गाभा-यातील मेघडंबरीचे काम पूर्ण* 

*श्रींच्या गाभा-यातील मेघडंबरीचे काम पूर्ण* 

 *श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून लाकडी मेघडंबरी अर्पण;* 

 *लाकडी मेघडंबरीस नांदेड येथील दानशुर भाविकाकडून २ कोटी ४५ लाखाची चांदी अर्पण* 

सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर.

पंढरपूर (ता.04) श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये श्री.विठ्ठल गाभारा व श्री.रूक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये श्री विठ्ठल गाभारा येथील लाकडी मेघडंबरी चांदीने मडवून बसविण्यात आली असून, रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बसवण्याचे काम सुरू आहे. या मेघडंबरीस नांदेड येथील दानशुर भाविक श्री सुमित गणपतराव मोरगे, नांदेड यांनी 2 कोटी 45 लाखाची चांदी अर्पण केली असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.सदरच्या दोन्ही मेघडंबरी मंदिर समितीस प्राप्त झाल्या असून, मेघडंबरीचे पुजन मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करून श्री विठ्ठल गाभा-यात बसविण्यात आली आहे व श्री रुक्मिणी गाभाऱ्यात बसवण्याचे काम सुरू आहे. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, सल्लागार परिषद सदस्य अनिल अत्रे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, ह.भ.प. विष्णु महाराज कबीर, विभाग प्रमुख संजय कोकीळ, ज्ञानेश्वर कुलकर्णी, अतुल बक्षी, देणगीदार सुमित मोरगे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

  श्री संत कबीर महाराज मठ व फडाकडून मंदिर समितीस दोन लाकडी मेघडंबरी सेवाभावी तत्वावर मोफत मिळाल्या होत्या. या दोन्ही मेघडंबरीस सुमारे 2 कोटी 45 लाखाची चांदी नांदेड येथील दानशुर भाविक सुमित मोरगे यांनी बसवून दिली आहे. त्यासाठी श्री विठ्ठल गाभा-यातील मेघडंबरीला सुमारे 135 किलो (रू 1 कोटी 46 लाख) व श्री रूक्मिणीमातेच्या गाभा-यातील मेघडंबरीला सुमारे 90 किलो (रू 99 लाख 73 हजार) चांदीचा वापर करण्यात आला असून, मेघडंबरीला चांदीपासून सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. सदर चांदीचा पत्रा 16 ते 26 गेजचा असून, सदरचे काम मे. जांगिड सिल्वर वर्क्स, पुणे यांनी केले आहे. त्यासाठी 13 कारागीरांनी 25 दिवसांत काम पूर्ण केले आहे. याशिवाय, सदरच्या दोन्ही लाकडी मेघडंबरी तेजस फर्निचर पंढरपूर येथील अमोल सुतार, बाळू सुतार, पांडूरंग लोंढे या कारागीराने तयार केल्या होत्या. त्यासाठी देवरूख जि. रत्नागिरी येथील 3 ते 4 वर्षापूर्वीच्या सागवानी लाकडाचा वापर केला असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.