यंदाच्या आषाढी यात्रेत वारकरी भाविकांसाठी चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

शिवसेना सोलापूर संपर्क प्रमूख प्रा. शिवाजीराव सावंत

यंदाच्या आषाढी यात्रेत वारकरी भाविकांसाठी चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

यंदाच्या आषाढी यात्रेत वारकरी भाविकांसाठी चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

यंदा मागील वर्षाचा विश्वविक्रम मोडू : प्रा. शिवाजीराव सावंत 

पंढरपूर हरिभाऊ प्रक्षाळे शुक्रवार दिनांक 12 जुलै....गतवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपुरात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सुरुवातीलाच पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधान झाल्याने यंदाची आषाढी वारी मोठी प्रमाणावर भरण्याची शक्यता आहे. येणार्‍या भाविकांना आरोग्य विभागाच्यावतीने मोफत औषधोपचार, आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याकरीता वाखरी, भक्तीसागर ६५ एकर, तीन रस्ता व गोपाळपूर येथे महाआरोग्य शिबीर घेण्यात येत आहे. पावसाची शक्यता असल्याने सर्वच ठिकाणी वाटरप्रूफ शामियाना उभारण्यात येत आहे. या शिबीराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्या ठिकाणी निवासी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, भैरवनाथ शुगर वर्क्स, जयवंतराव सावंत शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, हजारो स्वयंसेवक सज्ज करण्यात आले आहेत. अधिकाधिक भाविकांना आरोग्यसेवेचा लाभ देण्यात येणार असून गत्तवर्षापेक्षा जास्त भाविक या शिबिराचा लाभ घेतील अशी माहिती शिवसेना सोलापूर संपर्क प्रमूख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली.

      गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्यावतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या तयारीची पाहणी करण्यासाठी प्रा. शिवाजी सावंत हे गुरुवारी भक्तीसागर येथे आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आरोग्यमंत्र्यांचे स्वयंसाहाय्यक अरुण लटके, सिव्हिल सर्जन डॉ. सुहास माने, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुडके, शाम गोगाव, गुरुनाथ ठिगळे, श्याम सावजी, दत्तात्रय पवार, रुपेश कोळेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

  प्रा. सावंत म्हणाले की, गतवर्षी महाआरोग्य शिबीरातून ११ लाख ६४ हजार भाविकांनी मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घेतला होता. यावेळी पाऊस काळ चांगला झाला आहे.त्यामुळे शेतकरी समाधानी असून वारीत भाविकांची संख्या वाढणार आहे. येणार्‍या भाविकांना प्राथमिक उपचार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्दी, थंडी, ताप, खोकला, अंग दुखी, पाय दुखी याचबरोबर त्यांना जे जे विकार उदभवतील त्यावर उपचार आरोग्य विभागाकडून करण्यात येईल. आणि त्याच्यासाठीची जी सुविधा आहे. ती भैरवनाथ शुगरकडून मोफत करण्यात येणार आहे.