बार्शी तालुक्यातील पांगरी फटाके स्फोट प्रकरणातील वारसांना प्रत्येकी ५लाख रुपये मंजूर.

कामगार आयुक्त न्यायालय यांच्याकडे प्रस्ताव दाखल वारसाना लवकरच आर्थिक मदत मिळणार

बार्शी तालुक्यातील पांगरी फटाके स्फोट प्रकरणातील वारसांना प्रत्येकी ५लाख रुपये मंजूर.

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या प्रयत्नाला यश. 

बार्शी तालुक्यातील पांगरी फटाके स्फोट प्रकरणातील वारसांना प्रत्येकी ५लाख रुपये मंजूर.

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन सोलापूर शाखेच्या अंतर्गत राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे व जिल्हा कार्याध्यक्ष श्री संजय पवार यांनीपांगरी फटाके स्फोट प्रकरणातील मृत्यूच्या वारसांना तत्काळ मदत मिळणे कामी महिला आयोगाकडे लेकी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने महिला आयोगाने दखल घेऊन सोलापूर येथील जिल्हाधिकारी यांना लेखी आदेश देऊन पांगरी येथील फटाके स्फोट प्रकरणातील त्या मागासवर्गीय पाच महिलांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव तत्काळ दाखल करावे असा आदेश दिल्यामुळे सोलापूर जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांनी या घटनेचा तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवून पाठपुरावा केला असल्याने सदर स्फोटातील वारसांना

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५ लाख मंजूर करण्यात आले आहेत.

काही महिन्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी येथे अनधिकृत फटाके फॅक्टरीला भीषण आग लागून पाच महिलांचा मृत्यू झाला होता तर एक जण त्यामध्ये जखमी होती. बार्शी तालुक्यातील मौजे पांगरी येथील जमीन गट क्रमांक 469 मध्ये श्री युसुफ हाजी मणियार त्याच्या मालकीच्या जागेत त्यांनी व त्यांचे भागीदार श्री नानासाहेब शिवाजी पाटेकर यांनी बेकायदेशीर शुभेच्छा दारूचे गोडाऊन मध्ये उत्पादन व साठा केल्याने या ठिकाणी १ जानेवारी २०२३रोजी दुपारी ३ वाजता भीषण आग लागून स्फोट झाला होता. स्फोटातील दुर्घटनेत ५ महिला मजुरांचा मृत्यू झाला होता तर १ जण जखमी झाले होती. या घटनेची माहिती मिळताच अपर जिल्हाधिकारी सोलापूर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण विभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर व तहसीलदार इतर संबंधित विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळाच्या ठिकाणी कातडीने दखल घेऊन मदत बचाव कार्य हाती घेतले यामध्ये जिल्ह्यातील नगरपरिषद एनटीपीसी यांच्या शी संपर्क साधून घटना स्थळी ९ अग्नीक्षमक वाहने मागविण्यात आली होती. ॲम्बुलन्स व खाजगी वाहनातून ६ जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर सफोट प्रकरणांमध्ये चौकशी अहवालानुसार युसूफ हाजी मणियार आणि नानासाहेब पाटेकर यांनी जमीन गट नंबर४६९ मध्ये बेकायदेशीर फटाके व शोभेची दारूचे गोडवान व साठा केल्याने जीवित हानी झाली असल्याने हिशोब मणियार व नानासाहेब पाटेकर यांचे वर भादवी कलमानुसार गुन्हे दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मनियार व पाटेकर यांना बार्शी तालुक्यातील शिरवळे व तडवळे या ठिकाणी अधिकृत परवाना दिलेला असताना त्यांनी मात्र बार्शी तालुक्यातील पांगरी येथे आनाधीकृतपणे फटाके शोभेची दारू साठा करून स्फोटक नियमाचा भंग केला होता. जमीन गट क्रमांक ३९५ जमीन गट क्रमांक५९२/१ हे परवाने मनियार व पाटेकर यांच्या असणारे रद्द करण्यात आले आहेत . या दुर्घटनेतील सखोल चौकशी करून शासनास अहवाल पाठवल्याने स्फोट प्रकरणातील मृत्यू झालेल्या प्रत्येकी वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून कामगार आयुक्त न्यायालयाकडून स्फोट प्रकरणी मृत्यू झालेल्या वारसांचे मिळणारे आर्थिक मदत प्रलंबित असून तीही त्या वारसांना लवकरच मिळेल असे समजते