उपजिल्हा रुग्णाच्या सोहळ्याकडे खासदार आमदार अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

आरोग्यमंत्र्यांची एकला चलो रे ची भूमिका

उपजिल्हा रुग्णाच्या सोहळ्याकडे खासदार आमदार अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

अन आरोग्यमंत्र्यांना हे वाक्य झोंबले 

आज पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये 200 बेडच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णाच्या भूमिपूजन सोहळा पत्रिकेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार, आमदार, अधिकारी यांची नावे टाकण्यात आली होती परंतु या कार्यक्रमाकडे सर्वांनीच पाठ ठरवली असल्याचे कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसून आले. पत्रिकेत कार्यक्रमाची वेळ दुपारी दोन होती परंतु कार्यक्रमाला सुरुवातीला तीन वाजता उशिरा करण्यात आली .या भूमिपूजन सोहळ्याला फक्त आरोग्य मंत्री सावंत व सावंत कुटुंबीय आणि आरोग्य विभागाचे अधिकारी एवढेच उपस्थित होते त्यामुळे या कार्यक्रमातून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एकला चलो रे ची भूमिका स्पष्ट केली आहे.

पंढरपूर पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख यांना परिचारक समर्थक म्हणून ओळखले जाते त्यांनी प्रथमच आपले मनोगत व्यक्त करताना आरोग्य मंत्री च्या समोर स्टेजवरच आरोग्य विभागाचे पाढे वाचत वाभाडे काढल्यामुळे त्यांची काही वाक्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना झोंबली त्यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणातून पलटवार करत कार्यक्रम पत्रिका ही जिल्हा प्रशासनाचा प्रश्न आहे त्यात आरोग्य विभागाचा काही संबंध नाही असे म्हणत जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे मान पान न घेता सर्वांनी कार्यक्रमाला यायला पाहिजे हे तुमच्या नेत्यांनाही तुम्ही सांगा हे म्हणण्यास आरोग्यमंत्री सावंत विसरले नाहीत. परंतु ज्यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवत मुख्यमंत्र्याकडे प्रयत्न उपजिल्हा रुग्णाचा प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लावून मंजुरी आणली त्यांनाही या कार्यक्रमाविषयी श्वासात घेतले नसल्याने आमदार समाधान आवताडे यांनी कालच काही प्रसिद्धी माध्यमां समोर आरोग्य मंत्री सावंत यांचा व भूमिपूजन सोहळा कार्यक्रमावर बहिष्कार टाकत निषेध व्यक्त करत असल्याचे प्रसिद्धी माध्यमा समोर सांगितले. त्याचबरोबर पंढरपूर भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक विक्रम शिरसाठ यांनीही आरोग्य मंत्री व उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण स्थानिक नगराध्यक्ष किंवा किंवा भाजप कार्यकर्त्यांना दिले नसल्यामुळे तसेच हे रुग्णालय उभा करण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे स्वर्गीय आ. सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार व भाजपचे खांदे समर्थक या नाही निमंत्रण न दिल्यामुळे आमचा उपजिल्हा रुग्णाच्या भूमिपूजन सोहळ्यावर निषेध असल्याचे प्रसिद्धी माध्यमा समोर माहिती दिली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला फक्त स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ बी पी रोंगे हेच हजर होते आरोग्य विभागाचे डॉक्टर, व आरोग्य सेविका, आशा वर्कर हेच फक्त हजर होत्या. हेकेखोर मंत्री व राजकीय नेत्यांच्याअशा वर्तूनुकी मुळे स्थानिक प्रशासनाला या ठिकाणी कामे करणे जिकरीचे होते हे मात्र नक्की आहे.