जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने शिर्डी येथे समाज सेवा रत्न पुरस्कार सन्मान संपन्न. 

दुसरे राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिर येणाऱ्या रविवार दि.११जून रोजी शिर्डी येथे

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने शिर्डी येथे समाज सेवा रत्न पुरस्कार सन्मान संपन्न. 

जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने शिर्डी येथे समाज सेवा रत्न पुरस्कार सन्मान संपन्न. 

आज गुरुवार दिनांक २७ एप्रिल रोजी दुपारी शिर्डी येथे मानवाधिकार सुरक्षा फाउंडेशन मध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली अशा पदाधिकाऱ्यांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र आहेर यांच्या हस्ते समाजसेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे . या यावेळी शिर्डी येथील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे उत्तर विभाग प्रमुख श्री ज्ञानदेव गोंदकर पाटील यांनाही समाजसेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. तसेच श्री दत्तात्रय तळले पाटील , श्री न्यानेश्वर माऊली सोनवणे, एडवोकेट श्री नयन कुमार पवार कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री रावसाहेब जगताप अहमदनगर जिल्हा सहसचिव श्री राजेंद्र लंगोटे कोपरगाव इत्यादी पदाधिकारी मान्यवरांचा पुरस्कर व सन्मान राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र आहेर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम घरत हे आज शिर्डी येथील उत्तर विभाग प्रमुख ज्ञानदेव गोंदकर पाटील यांची भेट घेऊन पुरस्कार व सन्मान कार्यक्रम झाल्यानंतर पुढील दुसऱ्या राज्यस्तरीय शिबिराची चर्चा व बैठक घेण्यात आली. जागतिक मानवअधिकार सुरक्षा फेडरेशनचे समाजसेवा रत्न पुरस्कार कार्यक्रम मोठ्या आनंद उत्सहा मध्ये संपन्न झाला .त्यानंतर श्री ज्ञानदेव गोंदकरपाटील यांनी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांचे आभार मानले. यावेळी दुसरे राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिर येणाऱ्या रविवार दि.११जून रोजी शिर्डी येथे आयोजन करण्यात आले असल्याचे बैठकीमध्ये सर्वांनु एकमताने ठरले आहे. आज गुरुवार शुभ दिनांक 28 एप्रिल रोजी शिर्डी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम घरत यांचे श्री ज्ञानदेव गोंदकर पाटील यांनी श्री साईबाबांचे दर्शन घडवून आणले.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दक्षिण विभाग अध्यक्ष दत्तात्रय तळले पाटील यांनी केले. दुसऱ्या मार्गदर्शनावर शिबिराची पुढील वेळ निश्चित करून सर्व पदाधिकारी यांना सविस्तर माहिती दिली जाईल असे सांगण्यात आले.