दामाजी महाविद्यालय शिष्यवृत्ती गैरवापर प्रकरणी फौजदारी दाखल करा -डी. के. साखरे

अहवालमध्ये प्राचार्य एन. बी. पवार यांनी 26 लाख रुपयांचा गैरवापर केल्याचे नमूद

दामाजी महाविद्यालय शिष्यवृत्ती गैरवापर प्रकरणी  फौजदारी दाखल करा -डी. के. साखरे

दामाजी महाविद्यालय शिष्यवृत्ती गैरवापर प्रकरणी

फौजदारी दाखल करा -डी. के. साखरे

मंगळवेढा दि..5नोहेंबर जि. सोलापूर -श्री. संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा या महाविद्यालयातील मागसवर्गीय विध्यार्थी शिष्यवृत्ती रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी प्राचार्य एन. बी. पवार यांचे विरुद्ध फौजदारी दाखल करा अशी मागणी दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे राज्य अध्यक्ष डी. के. साखरे यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांचेकडे एका निवेदणाद्वारे केली असून त्याच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री,समाजकल्याण आयुक्त, जिल्हाधिकारी व कुलगुरू सोलापूर विद्यापीठ यांना पाठविल्या आहेत.   साखरे यांनी केलेल्या मागणीमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्या महाविद्यालयानी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृतीपासून वंचित ठेवले आहे त्या महाविद्यालयावरही कारवाई करा अशी मागणीही साखरे यांनी केली आहे.सोलापूर विद्यापीठाने नेमलेल्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालमध्ये प्राचार्य एन. बी. पवार यांनी 26 लाख रुपयांचा गैरवापर केल्याचे नमूद केले असून त्यामुळे प्राचार्य पवार यांचे विरुद्ध फौजदारी दाखल होणे अटळ आहे, असे साखरे यांनी म्हटले आहे. प्राचार्य पवार यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा साखरे यांनी दिला आहे.