पती सुरज रुपनर यांच्या छळाला कंटाळून पत्नी ऋचाने केली आत्महत्या.

डॉ.सुरज पतीच्या व्यभिचारी वागणुकीचा जाब विचारल्याने

पती सुरज रुपनर यांच्या छळाला कंटाळून पत्नी ऋचाने केली आत्महत्या.

पती सुरज रुपनर यांच्या छळाला कंटाळून पत्नी ऋचाने केली आत्महत्या.

डॉक्टर ऋचाने आत्महत्या केल्याने सांगोला तालुक्यात खळबळ.

डॉ.सुरज पतीच्या व्यभिचारी वागणुकीचा जाब विचारल्याने ऋतुच्याला सतत करीत होता मारहाण

व्यभिचारी वागणूक करीत असताना डॉक्टर पती सुरज भाऊसाहेब रुपनर हा आढळून आल्याने पत्नी ऋचा हिने विचारणा केली असता तिला शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून शारीरिक मानसिक त्रास देऊन बघून घेतो असे सातत्याने धमकावून नेहमी सुरज रूपनर हा एम आर आय मशीन विकत घेण्याकरता माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर आत्महत्या कर म्हणून सातत्याने त्रास देत असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर डॉक्टर ऋचा रुपनर हिने गळफास घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपविले. 

डॉक्टर ऋचा रुपनर गुरुवार ६ जून रोजी पहाटे पावणे सात पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातील - वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अकस्मात मयत म्हणून फिर्याद दिली होती त्यानंतर अंत्यविधी होऊन तीन दिवसाचा विधी कार्यक्रम संपल्यानंतर आज शनिवार आठ रोजी सांगोला पोलीस स्टेशन मध्ये मयत मुलीचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील राहणार पंढरपूर यांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर ऋचा हिचा विवाह सांगोला येथील प्रसिध्द फॅबटेक उद्योग समुहाचे भाऊसाहेब रुपनर यांचे चिरंजीव डॉक्टर सुरज भाऊसाहेब रुपनर यांच्याशी झाला होता ते सांगोला येथील फेबटेक इंजिनिअरिंग कॉलेज वसाहतीमध्ये राहत होते ते दोघेही एमडी रेडिओलॉजिस्ट होते त्यांचे पंढरपूर येथे गाडगेबाबा चौकात हॉस्पिटल असून तेथे ते वैद्यकीय व्यवसाय करीत होते. डॉक्टर सुरज यांची वागणूक व्याभिचारी होती ते व्याभिचारी करीत असताना पत्नी डॉक्टर ऋचा रुपनर यांनी जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन तुला बघून घेतो अशी धमकी देत होता व दिली होती तसेच सुरज यास त्याच्या व्यवसायासाठी एम आर आय मशीनची गरज होती. ती विकत घेण्याकरता ऋचा हिचे नावे असलेली पंढरपूर येथील जमिनीवर कर्ज काढून किंवा तुझ्या माहेरची लोकांकडून पैसे घेऊन ये अशी मागणी केल्याने बहिण ऋचा हिने विचारणा केली असता तू आत्महत्या कर नाहीतर पैसे आणून दे अशी चितावणी दिल्याने ऋचाहीने तिचे राहते घरी सहा जून २०२४ रोजी सकाळी पावणे सातच्या पूर्वी घरातील पंख्याला ओढणीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.भाऊसाहेब रुपनर हे फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक आहेत. सांगोला तालुक्यामध्ये भाऊसाहेब रुपनर यांची फॅबटेक मल्टीस्टेट को आप सोसायटी तसेच कारखाने फार मोठे उद्योग असून त्यांच्या कुटुंबात त्यांच्या सुनबाई डॉक्टर ऋचा सूरज रुपनर यांनी आत्महत्या केल्याने सोलापूर जिल्ह्यात व सांगोला तालुक्यात खळबळ उडाली असून शहरातील चौका चौकामध्ये नागरिकातून चर्चेला उधाण आले आहे.